राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत परिवर्तन होणे आवश्यक !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावरआहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्यास्वरूपावर अवलंबून नसतो. […]
