महाडचा संगर केवळ पाण्यासाठी नव्हे तर मूलभूत मानवी हक्कांचा संगर
सुरेखा पैठणे कित्येक शतके उलटली तरी ह्या पवित्र भारतभूमीवर अस्पृश्य आणि स्त्रिया यांची गणती माणसात होत नव्हती. किडा मुंगीला साखर घालणारा हा धर्म, पशु पक्ष्यानं दाणे घालणारा हा धर्म, पाण्यावर जातीची अन धर्माची वेटोळे घालून बसला होता. ‘पाणी वाढ वो माय’ म्हणत अस्पृश्य म्हणवल्या जाणाऱ्या अठरापगड जातीतील (केवळ महार नव्हे) […]