बहुजन तरुणासाठी उच्च शिक्षण हि काळाची गरज 

मिथुनकुमार नागवंशी

मानवी मुल्यांचा विचार करता मनुष्य जीवन खूप सोपे झाले आहे.जीवन जगात असताना मनुष्याला अन्न, वस्त्र, व निवारा या निगडीत असलेल्या गरजा आपण अर्थशास्त्र, समाजशास्त्रकडून शिकत आलेलो आहोत. अन्न मिळाले कि वस्त्र व निवारा यासाठी मनुष्य नेहमी धडपडत असतो. पण या तिन्ही गोष्टीप्रमाणे मनुष्याला अजूनही काही महत्वपूर्ण गोष्टीची गरज खूप जास्त भासविते. आणि ती म्हणजे निरोगी आरोग्य आणि चांगले शिक्षण. चांगले शिक्षण मिळाले कि आपोआप हे कळू लागते कि, अन्न वस्त्र निवारा कसा मिळवायचा तो? आणि तो का मिळत नाही याची पण जाणीव होते.
मुबलक प्रमाणात अन्न भारतात असूनही दररोज १९ कोटी, ४० लाख लोक उपाशी राहतात याबाबतीत युनायटेड नेशनच्या फूड अंड अग्रीकल्चर आर्गनायझेशन ने या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारतात दररोज २४४ कोटीचे अन्नधान्य वाया जात असल्याचे म्हटले आहे. अन्यधान्य मुबलक प्रमाणात असूनही भारतात उपाशी राहणार्याची संख्या खूप मोठी आहे. याची काळजी व ते अन्न पुरविण्याचे काम प्रधानमंत्री / मुख्यमंत्री यांनी करायला हवे होते. कारण ती त्यांची जवाबदारी आहे.

भारतामध्ये मुबलक प्रमाणात कापूस पिकत असताना सुद्धा वस्त्र मिळायला इथला बहुजन मूलनिवासी हा मोहताज भिकारी झालेला आहे. कारण कि, कापूस इथल्या मोठमोठ्या व्यापारांच्या कंपनीमध्ये शुल्लक किमंत देवून शेतकऱ्याकडून विकत घेतले जावून कंपनीमध्ये कापड तयार केले जाते. पण त्याचा निव्वळ नफा कंपनीला होतो. शेतकऱ्याच्या मुलांना साध वापरायला कपडे मिळत नाही. पण कंपनीकडून तयार होऊन येणारा कपड्याची किंमत अवाढव्य असते.जे सामान्य लोकांना कधीही परवडण्यासारखं नसते. एकीकडे काही मुठभर लोकांकरिता वापरायला प्रत्येक मिनिटाला खूप कपडे असतात. तर काही लोक फाटलेले कपडे घालून त्याला फॅशन म्हणून संबोधतात. एकदा वापरलेले कपडे काही लोक पुन्हा वापरत नाहीत. पण काही लोकांना ते पण मिळत नाही. याच साध व सोप उदाहरण आपल्याला गडचिरोली व मेळघाट सारख्या ठिकाणी दिसून येत.

निवारा म्हटला कि, हजारो कोटी लोक डोळ्यासमोर येतात ज्यांना साधा निवारा पण राहायला मिळत नाही.आजही पारधी समाज हा गल्ल्याबोळातून भटकंती करीत असतो. ना राशन कार्ड ना आधार कार्ड, जिथे थकले तिथेच निवारा बनविल्या जातो. व तेही फक्त साडीचा आधार घेऊन त्याला झोपडीचा आधार दिला जातो. याचं उदाहरण नागपूर धंतोली च्या बाजूला दिसून येईल.
शिक्षण आज श्रीमंताच झालेला आहे. महागडं शिक्षण बहुजनांना परवडण्यासारख नसते. कारण सगळीकडे त्याच भांडवल केल्या गेल. शिक्षाणाचा बाजार मांडल्या गेला. कॅनडा, चीन, अमेरीकेसारखा तसेच श्रीलंका सारख्या छोटे देशही शिक्षण्याचा बाबतीत खूप अग्रेसर असून प्रत्येक मुलांची काळजी हि बारकाईने घेतली जाते. सरकार हि त्यांची जबाबदारी घेतो. परंतु, भारतामध्ये TATA INSTITUTE OF SOCIAL SCIENCES, JAWAHARLAL NEHRU UNIVERSITY सारख्या नामवंत संस्थेमध्ये आज अवाढव्य फीस आकारात आहेत. जे सामान्य गरीब विध्यार्थी जी बहुजन समाजातील असून त्यांच्याजवळ फीस भरायला साधी फीस वा नोटबुक घ्यायला पैसे नसतात.

एकीकडे सरकारने स्कॉलरशीपची सोय केलेली आहे. आणी दुसरीकडे ती मिळूच नये याची पण सोय केलेली आहे. उच्च शिक्षण फक्त तोंडावरचे झालेलं आहे. ८५% बहुजांमध्ये खूप हुशार तरुण वर्ग आहे पण त्यांची गुणवत्ता पैसासमोर कमजोर होत आहे. सरकारने यावर विचार करायला हवा. भारतीय संविधानात असलेले मुलभूत अधिकार हे पायदळी तूडवीत आहेत. उच्च शिक्षण असलेले नामवंत संस्थेमध्ये जनरल कॅटीगिरीचे जागा वाढवून आरक्षणाचे जागा कमी करण्याचा कट चाललेला आहे.
निरोगी जीवन हि आज काळाची गरज आहे. पण बराचश्या सरकारी रुग्णालयामध्ये एक्स रे मशीन किवा ज्या गरजेच्या वस्तू असतात. त्याची कमतरता भासते आहे. ज्यामुळे मानसिक स्वास्थ खालावत चाललेले आहे. भारताचा अर्थसंकल्पामध्ये आरोग्य बजेट हा खूपच कमी बनविल्या जातो ज्यामुळे आरोग्य सिस्टम रोडावत चाललेली आहे. यातून मार्ग काढायचा आहे. आणि ते म्हणजे चांगल शिक्षण घेण्याची जिद्द. निराश ना राहता उच्च शिक्षणासाठी नेहमी प्रयासरत राहणे व महापुरुषाच्या विचारावर चालणे होय.

राष्ट्रपिता जोतीरावजी फुले यांचाकडून बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रेरणा घेऊन अर्थशास्त्र व इतर विषयात पारंगत हासील केली. महापुरुषाचे विचार हे कधीच मरत नाही. मनुष्याने फक्त शिक्षण घेऊन मरेपर्यंत नोकरी करीत राहून आपल्याच जीवनात सुखरूप राहून स्वार्थी बनने होय. त्याहीपलीकडे मनुष्याने उच्च शिक्षण घेऊन इतर बहुजन समाजामध्ये असलेले तरुणांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करीत राहणे व त्याचबरोबर समाजासाठी तन, मन, धनाने कटीबद्ध राहावे. नोकरी मिळाली नाही किवा सरकारी नोकरीच्या मागे न लागता उद्दोजक बनून आत्मनिर्भर बनावे व समाजाला योग्य दिशा द्यावी.

~~~

मिथुनकुमार नागवंशी

मानसिक समुपदेशक, टाटा सामाजिक विज्ञान संस्था.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*