त्यांची यत्ता कुठली?

ॲड मिलिंद बी गायकवाड

वेल, सोशल मिडियात यायची मुळीच इच्छा नव्हती, पण सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी ह्यांच्या ‘ब्रा’संदर्भातल्या post मुळे सोशल मिडियात वैचारिक घुसळण होतेय.अनेक उलट सुलट साधक बांधक प्रतिक्रिया येतात आहेत.. हरकत नाहीं.., मी त्याचे स्वागतच करतोय..
.. पण…

ह्याच भारत देशात साऊथ मध्ये एक शहीद नांगेली नावाची स्त्री होऊन गेली जी भारता सारख्या जातीयवादी समाज व्यवस्थेत कानिष्ठ जातीत जन्माला आली…
… तिला आणी तिच्या जात बांधव भगिनींना स्तन झाकायचा अधिकारच नव्हता… तिला तिच्या स्तन भाराचा टॅक्स उच्यवर्णीय राजा कडे जमा करावा लागत असे…
स्तन ही अतिशय नैसर्गिक गोष्ट…
तो बाळगायचा टॅक्स?…
ह्या अन्यायाच्या विरोधात पेटून तिने स्वत स्वतःचे स्तन कोयत्या ने कापून केळीच्या पानावर राजाला भेट म्हणुन पाठवले आणी हजारो वर्षाच्या अन्यायाच्या विरोधात बंड पुकारले…
त्यातच अती रक्त स्त्राव होऊन तिचा मृत्यू घडला…
आणी पत्नी वियोग सहन न होता तिच्या पतीने तिच्या चितेत उडी टाकली.
..
ह्या जातं वास्तवा बद्दल कोणी बोलणार आहे कि नाहीं?
नेमक्या वाडार समाजातील स्त्रियांनाच चोळी घालायची कां बंदी होती? नेमक्या अस्पृष्य समाजातील पोरींच्या डोकयात बट कां येत असे? मग नेमकी तिलाच देवदासी कां सोडण्यात येत असे? देवदासी आणी नग्न पूजे वर तर् उत्तम कांबळे सरांचे पुस्तकंच आहे कि..

उच्य वर्णीय शोषकांच्या वासना पूर्ती साठी शेकडो वर्षे दलित मागास वर्गीय आणी गरिबांच्या पोरी बळी पडत आल्यात… त्यांचा स्त्री वाद कोणता? त्यांची यत्ता कुठली? कळाले तर् मला ही समजावा महाराज..

ॲड मिलिंद बी गायकवाड

लेखक नाशिक येथील रहिवासी असून अधिवक्ता तसेच सामाजिक कार्यकर्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*