इथे कसली आलीय विविधता? इथे वर्चस्व ठराविक जातींचे!

संकेत रायपुरे

काही गोष्टी फार बेसिक आणि सोप्या असतात.
जसं की,
देशात कोणत्या जातींची लोकसंख्या किती आहे? पैकी judiciary, executives, academia, media houses, sports, Lecturers in prominant Institutes like IITs, IIMs, Central Universities, Private Universities, Important positions in Private Companies etc. मध्ये कोणत्या जातीचं किती representation आहे? यात एक पॅटर्न लक्षात येईल. Almost 90% जागा “सवर्णांनी”(त्यातल्यात्यात ब्राह्मणांनी) व्यापल्या आहेत. आणि 10% जागा इतरांनी(SC, ST, OBC).
म्हणजे SC, ST, OBC यांची संख्या 80% पेक्षा जास्त असताना त्यांचं representation इतकं कमी का?
म्हणजे तुम्ही स्वजातीय हेतूंमुळे आणि श्रेष्ठत्वाच्या अहंगंडामुळे भारताच्या बहुमुल्य human capital चा उपयोग तर करत नाहीच आहात पण वर्षानुवर्षे मागे असलेल्या समाजाला वर आणावं असंही तुम्हाला वाटत नाही.
या साध्या गोष्टींवरूनही हे लक्षात येईल की ‘मेरिट’ च्या नावाखाली ब्राह्मणांनी या देशाचं प्रचंड नुकसान केलंय.
परत इतक्या वर्षांनंतरही या गोष्टी लक्षात येत नसतील तर हे अनावधानाने झालं असेल असं म्हणूच शकत नाही आपण. ही एक well planned, well executed ब्राह्मण-सवर्ण मशिनरीच आहे जी सदैव बहुजनांना oppress करत असते. यामुळेच इथल्या बहुजन वर्गाला अजूनही पाहिजे त्या प्रमाणात representation दिल्या जात नाहीये. यात उजवे, डावे सगळेच येतात. Every savarna individual is a part of this Savarna Machinery working for the oppression of Bahujans. फरक इतकाच आहे की बऱ्याच लोकांना ते माहीत आहे आणि काहींना माहीत नाही. आणि ज्यांना माहीत नाही त्यांना ते सांगितलं तर ते ऐकायला तयार नाहीत. असो.

याला सवर्ण लोकं counter करताना म्हणतात की reservation वाल्यांची गुणवत्ता नाहीये. ते तितके हुशार नाहीयेत वगैरे. हे इतकं भंकस आणि illogical argument आहे की विचारता सोय नाही.

मुळात देशातील 80 टक्क्यातून जास्त जनता बिनडोक आहे, त्यांच्याकडे मेरिट नाही असे म्हणणे किती मूर्खपणाचे आणि अहंकारग्रस्त आहे! बरं उत्तरे द्यायचीच म्हटली तर ती देताही येतील. तर, सरळ आणि स्पष्ट उत्तर देताना कमीतकमी तीन मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजेत.

पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे संसाधनांची उपलब्धता. प्रत्येक राज्यात एकूण संसाधनांपैकी कुठल्या जातिकडे किती संसाधनं आहेत ह्याचा सर्वे केल्यास हे लक्षात येईल की वडिलोपार्जित जमिनी, भांडवल, त्यावर उभारलेले कारखाने, स्टार्टअप्स हे सर्व सवर्णांनी व्यापलेले आहे.

दुसरा मुद्दा असा की असे कितीतरी SC, ST आणि OBC मधली पोरं पोरी आहेत ज्यांनी open मधून admission घेतलीय, नोकऱ्या मिळवल्यात.. कितीतरी..! मग ते कुठे गेले? ते का नाही सेक्रेटरी लेव्हल ला पोहचत. त्यांना का नाही IITs, IIMs मध्ये प्राध्यापक म्हणून घेतल्या जात? आणि एखाद्या आरक्षणाने entry केल्यानंतर तिथे पास होऊन डिग्री मिळवण्यासाठी तर सारखेच निकष लागतात ना? की तिथे पास व्हायला वेगवेगळे मार्क्स घ्यावे लागतात. उलट तिथे faculty सवर्ण असली की सवर्ण पोरापोरींना आयते प्रॅक्टिकलचे मार्क्स मिळतात.(जे मोस्ट ऑफ द केसेस मध्ये होतच असतं)

तिसरा मुद्दा म्हणजे, गुणवत्ता आणि हुशारी जे आपल्या देशात मार्कांवरून ठरत असते, ते मिळवण्यासाठी एक सवर्ण कुटुंब आपल्या मुलाला किती सुविधा पुरवू शकतं आणि एक बहुजन कुटुंब किती?
उदा. देशातील सगळ्या private शाळांमध्ये कोणती पोरं आहेत हे बघा. तिथला खर्च किती आहे बघा. आपण सरळ अंदाजवर सांगू शकतो की 80-90% सवर्ण लोकांची पोरंपोरी इथे शिकतात. या उलट बहुजन वर्गातील पोरं बघा, जिल्हा परिषद, गावातील मराठी माध्यम शाळा, फार फार तर सेमी-इंग्लिश शाळा आणि rarest of the rare case (ज्यांना खर्च झेपतो आणि जे शहरात असतात) ते कॉन्व्हेंट वगैरे. आता IIT, IIM, NEET साठी गावाखेड्यातून येणाऱ्या पोरांची स्पर्धा अशा खासगी शाळेतून(ज्यांची महिन्याची फी लाख रुपये आहे) शिकणाऱ्या पोरांबरोबर आहे. त्यानंतर नोकरीसाठीची स्पर्धा अशा पोरांसोबत आहे ज्यांचे शिक्षण एखाद्या prominant private शाळेत झालंय जिथे अभ्यासापेक्षा other curriculum activities कडे जास्त भर दिला जातो आणि मग त्यांच्या CV मध्ये एक दोन पान तर फक्त विविध achivements नेच भरलेले असते. यांच्या सोबत गावखेड्यातून येणाऱ्या बहुजन पोरांची स्पर्धा तरी कशी होणार..??

अशा भरपूर गोष्टी आहेत ज्यात विशिष्ट जातीचंच वर्चस्व दिसून येईल. हे संसाधनांचं ध्रुवीकरण देशाचं किती नुकसान करत आहे हे एव्हाना देशप्रेमी म्हणून मिरवणाऱ्या कुणालाच कळत नाही का? आणि एकाच वर्गाचे हितसंबंध सांभाळणाऱ्या संस्था कधीच भारताला विकसित करू शकणार नाहीत हे ही कळत नाही?

‘हे, विविधतेत एकता म्हणणाऱ्या महाशयांनो’ देशात विविधता तरी कुठेय..? जवळपास सगळ्या जागा तर एका विशिष्ट जातीनेच व्यापल्या आहेत.

संकेत रायपुरे

लेखक पुणे येथील रहिवासी असून त्यांचे शिक्षण BA (English Literature) असून सध्या ते MA (Political Science) चे शिक्षण घेत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*