मंडल आयोगाच्या 30 वर्षानंतर ओबीसींची दशा आणि दिशा

राम वाडीभष्मे/कल्याणी राठोड ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, मुंबई’ येथे “ओबीसी आणि राजकीय आरक्षण” या विषयावर आयोजित चर्चासत्रात ओबीसी कार्यकर्ते, विविध संघटेनेचे पदाधिकारी व अभ्यासक यांनी उपस्थित केलेल्या समस्या, प्रश्न, मुद्दे व उपाय यावर आधारित हा लेखाजोखा इतर मागासवर्ग (ओबीसी) यांचे मागासले पण सिद्ध करण्यासाठी बिहारचे माजी मुख्यमंत्री बी पी मंडल […]

आधुनिक द्रोणाचार्य, एकलव्य आणि प्रतिकांचे युद्ध!

डॉ भूषण अमोल दरकासे तत्त्वज्ञ व्हॅलेंटीन वोलोशिनोव्हच्या मते, “प्रतीकात्मक चिन्ह हे वर्गसंघर्षाचे मैदान आहे.” [1]पार्लमेंटरी पॅनल च्या निष्कर्षनुसार अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) या शिक्षण आणि वैद्यकीय संशोधन संस्थेने जागेसाठी पात्र असतानाही अनुसूचित जाती/जमाती च्या डॉक्टरांना नौकऱ्या नाकारल्या. आयआयटी पीएचडी प्रवेशामध्ये सुद्धा शेकडो अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी अर्जदार पात्र असतानाही एकाही विद्यार्थ्याला […]

“भुरा” चे लेखक शरद बाविस्कर यांचा बहुजन विद्यार्थ्यांना महत्वाचा संदेश!

राम वाडीभष्मे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा -शरद बाविस्कर सरांशी जे.एन.यु भेटीतील चर्चा आपल्या सारख्या सामान्य विद्यार्थी हे सांस्कृतिक व भौतिकवादामुळे मागे असतात. त्यासोबतच ही व्यवस्था सुद्धा त्यांना येथून बाहेर पडू देत नाही. त्यामुळे येथून बाहेर पडून स्वतःला या स्पर्धेच्या युगात सिद्ध करणे आवश्यक आहे. ह्याकरिता […]

दिसून न येणारी जात…

सोनल शहाजी सावंत 2022 च्या अर्ध्यात आपण आलो आहोत. म्हणायला प्रगतीच्या वाटेवर आहोत, बाबासाहेबांनी शहरांकडे चला असा संदेश दिला आणि आपल्या समाजातल्या बर्‍याच कुटुंबांतील पहिली पिढी शहरात स्थिरावली. या कुटुंबांमधली उच्च शिक्षण घेणारी पहिली पिढी ‘कदाचित’ आमची असू शकते. लॉक डाऊन च्या काळात जशी कोरोनाची लाट आली होती तशी अजून […]

आंबेडकरी चळवळ आणि ओबीसी संबंध

ॲड. शिरीष मिलिंदराव कांबळे, विवेक घाटविलकर १९४६ साली विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांनी ‘शुद्र पूर्वी कोण होते ?’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या माध्यमातून शुद्रांचा (म्हणजे ओबिसींचा) इतिहास त्यांनी प्रथम उजेडात आणला. याच दरम्यान शेतकऱ्यांचे एक मोठे नेते डॉ. पंजाबराव देशमुख हे बाबासाहेबांना भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी ‘मी राज्यघटनेमध्ये ओबीसींसाठी महत्वाची […]

बुद्धाचा ‘ कार्यकारणभाव सिद्धांत’

आदिती रमेश गांजापूरकर जगातील प्रथम वैज्ञानिक तथागत गौतम बुध्द. बुद्धाने जगात वस्तुनिष्ठ आधारावर विचार मांडण्याची शिकवण दिली.त्यांनी एक नव्हे अनेक महत्वपूर्ण शाश्वत सिद्धांत मांडलेत.त्यांच्या अनेक सिद्धांत पैकी कार्यकारणभाव हा सिद्धांत विशेष महत्त्वाचा आहे.या सिद्धांत नुसार कोणतीही गोष्ट आपोआप निर्माण होत नाही.प्रत्येक गोष्टी ला समूळ कोणतेतरी कारण असते.बुद्धाचा कार्यकारणभाव हा सिद्धांत […]

दलित-बहुजन queer, मोठी शहर आणि आपलेपण

श्रावणी बोलगे मोठ्या शहरांमध्ये माणूस म्हणून व्यक्त होण्यास, स्वतःच अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यास वाव मिळतो. पण हा विचार करताना हे स्वातंत्र्य कोणाच्या वाटेला येत हा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे . लहान शहरातून, मोठ्या शहरांमध्ये अनेक कारणांसाठी स्थलांतर करणाऱ्यांना शहरांचा आवाढव्यपणा आणि झगमगता आवक करूच शकते . ह्यात जर तुम्ही queer असाल […]

झुंड- मानवी अस्तित्वाची लढाई

जे.एस. विनय नागराज मंजुळे परत आले आहेत आणि यावेळी ते 4 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या झुंड या त्यांच्या पहिल्या हिंदी चित्रपटाद्वारे धैर्याच्या अज्ञात कथा सांगत आहेत. नागराज अत्यंत संवेदनशील पद्धतीने लोकांचे चित्रण करण्यासाठी ओळखले जातात आणि त्यांच्या चित्रपटांमध्ये उच्च दर्जाचे सिनेमॅटोग्राफी, संगीत असते. यावेळी ही कथा नागपुरातील एका झोपडपट्टीतील […]

आंबेडकरी गीतांचे स्वरांकित विद्यापीठ प्रतापसिंगदादा बोदडे

June 10, 2022 pradnya 0

महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनामध्ये आंबेडकरी चळवळीचे अग्रस्थान आहे.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरणा घेऊन अतिशय निष्ठेने आणि कुठलाही लवाजमा न घेता जगभर आंबेडकरी चळवळीचे वैचारिक वारस निर्माण झाले आहेत.या सम्यक क्रांतीमध्ये आंबेडकरी गायक गीतकार आणि संगीतकरांचे अमूल्य योगदान आहे.अल्पशिक्षित समाजाची सांस्कृतिक भूक मिटवून त्यांच्या मस्तकात आंबेडकरी विचारधारेचा प्रवाह त्यांनी निर्माण […]

देश अमृत महोत्सवात व्यस्त, मेळघाट पाणीटंचाईने त्रस्त

राम वाडीभष्मे देश अमृत महोत्सवात व्यस्त, मेळघाट पाणीटंचाईने त्रस्त तब्बल दोनशेहून आधिक गावानध्ये तीव्र पाणीटंचाई अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वत रागांमध्ये वसलेला प्रदेश आहे. सर्विकडे डोंगराळ हिरवेगार, जैवविविधतेने नटून थटून, आदिवासी बहुल समाज जीवन व आदिवासी संस्कृती असलेला, तो एक भाग आहे. सोबतच विदर्भातील नंदनवन म्हणून […]