गांधी व गोडसे यांच्या binary politics मध्ये आंबेडकरवाद्यांनी पडू नये

राहुल पगारे

गांधी आणि फुले !
भाजपचा बाप, जन संघ व जन संघाचा बाप, हिंदु महासभा जेव्हा राजकारण समजण्याच्या पलीकडे होते, त्यांना तेव्हा मिसरुड पण फुटले नसेल अगदी त्या १९२० च्या काळात काँग्रेस गांधींच्या प्रभावाखाली आली असताना भारतीय राजकारणात गांधींनी “रामराज्य” संकल्पना आणुन राजकारणात “राम” प्रस्थापित केला.

आधुनिक भारताच्या रामराज्य कल्पनेला येऊन आज १०० वर्ष झालीत. ज्या फॅसिझमची सुजाण भारतीयांना चिंता वाटते त्या फॅसिस्ट शक्तीचा आदर्श ही गांधीची देण आहे. रामानं शिक्षण घेण्याचा अधिकार नाही म्हणुन शुद्र शभुंकाला मारणं व बाबासाहेबांनी दलितांच्या स्वातंत्र्य उद्धारासाठी स्वंतत्र मतदार संघाची मान्य झालेली मागणी गांधीने दहशतीत (तेव्हा दलित वस्त्यांवर काँग्रेस कार्यकर्ते हल्ले करत होते) आणि इमोशनल ब्लॅकमेल करुन रद्द करायला लावणं या दोन घटना एकाच नैतिक कसोटीवरच्या आहेत. रामाचा वैचारिक आदर्श गांधी प्रत्यक्ष राजकारणात जगत आले. त्याचा हा नमुना उदाहरण आहे.

दुसऱ्या बाजूला जोतीराव फुले ! ज्यांनी मराठी जणांच्या विस्मृतीतुन गेलेला शिवाजी राजा त्यांची समाधी शोधून, लिखाण पोवाड्यातुन समाजजीवन व राजकारणात आणला. गांधीने रामाला उचित मानुन कामे केले तर जोतीराव फुलेनी शिवाजी यांना. छत्रपती शिवरायांना आदर्श मानण्याऱ्या जोतीराव फुलेनी काय काय कामे केलीत हे सांगायची गरज नाही. फुलेनी समतावादी स्री दास्य मुक्ती व शिक्षणासाठी कामे केलीत आणि आपल्या उभ्या आयुष्यात कधी मंदिर बांधले नाही, कधी भजन कीर्तन केले नाही. उद्याच्या पिढीची गरज ओळखून त्यांना त्या गरजापुर्तीची साधनं दिलीत.

भंगी कितीही उच्च शिकला तरी वर्णधर्माचा आदर करत आपले भंगी काम करत राहावे म्हणणारे गांधी आणि महारमांगाच्या लेकरांना व मुलींना स्वताच्या खांद्यावर घेऊन शाळेत आणुन शिकविणारे फुले यांच्यात जमीन असमानचं अंतर आहे. So we are not same bro.

बाकी गांधी सोबत जे घडलं त्याबद्दल एक माणूस म्हणून सहानुभूती आहे, पण गांधी मरते नहीं वैगरे डायलॉग व नसलेल्या गुणांचे उदात्तीकरण हे पटणारे नाही हे प्रामाणिकपणे नमूद करतोय.
आंबेडकरवाद्यांनी समाज सांस्कृतिक राजकीय चळवळीचा बारकाईने अभ्यास करुनच ब्राह्मण सवर्णांनी लादलेल्या, चालवलेल्या उदात्तीकरण चळवळीचा हिस्सा बनु नये. चळवळीपेक्षा चळवळीचा आदर्श खुप महत्वाचा व तोच दिशादर्शक असतो. Mind it.

अत्यंत थोडक्यात : गांधी व गोडसे यांच्या binary politics मधे आपण भाग घेऊ नये.

राहुल पगारे

लेखक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

1 Comment

  1. Very well written Mr. Rahul Pagare. You explained the difference between Mahatma Phule and and Gandhi so nicely. Hopefully all Ambedkerites will remember these things.

    Jai Bhim!!

Leave a Reply

Your email address will not be published.


*