क्रांतिकारी फुलनदेवी यांचे शेखर कपूरने केलेलं विकृतीकरण

राहुल पगारे

आजच्या दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारी १९८१ मधे बेहमैई गावात २२ उच्चवर्णीय ठाकुरांना फुलन देवी यांनी रांगेत उभे करुन गोळ्या घालत आपल्या अत्याचाराचा बदला घेतला होता. सवर्णांना अशा प्रकारे मिळालेली ही पहिली शिक्षा असावी. याच घटनेमुळे जगभर खळबळ उडाली आणि Bandit Queen हा फुलन देवी यांच्यावर शेखर कपूरने सिनेमा बनवला. हा चित्रपट बनवुन शेखर कपुरला सत्य समोर आणायचं होतं का ? की त्याला फुलनदेवीच्या संघर्षाला समोर निष्पक्ष आणायचं होतं ? तर असं काही नाही. तर फुलनदेवी वर सिनेमा बनवून भावड्याला character assassination करायचं होतं असंच वाटतं.

जगभरात त्यांच्या बद्दल, संघर्षाबद्दल जी उत्सुकता निर्माण झाली होती, त्यांचा खराखुरा संघर्ष, स्री म्हणुन एक लढा समोर ना येवोत म्हणून त्यांच्या बद्दल माहीत करुन घेण्याची जगभरातील उत्सुकता डोळ्यासमोर ठेऊन फुलनदेवीला त्यांच्या संघर्षाला अत्यंत विद्रुप, misrepresent करून समोर केलं. हा मुवी बघाल तर फुलन देवी पुर्ण मुवीत पिडित आणि मानसिक समतोल बिघडलेली दिसेल. चित्रपटात तिची भोगलेली परिस्थिती व तिचा उभा राहिलेला संघर्ष आणि आपल्या अत्याचाराचा बदला घेण्याचा, निर्णयक्षमता, न्याय मिळवण्याच्या संघर्षाला कुठेच न दाखवता, फुलनदेवी म्हणजे अत्यंत गरीब, दयनीय, काहीच कळत नसलेली नुसती मानसिक समतोल बिघडलेली म्हणून समोर राहिल. एक दिग्दर्शक म्हणून एवढा टुकार प्रयत्न ?

फुलनदेवीने अत्यंत पिडा व अत्याचार सहन केले पण मनाची प्राबल्यता त्यांची दाद देण्या लायक होती म्हणून तर संघर्ष करता आला! फुलनदेवी मानसिक समतोल बिघडलेली असती तर गोरगरीब दुबळ्यांना लुटलं असतं. ठाकुर गैग तेव्हाही तिच्याशी हातमिळवणी करायला तयार होती जेव्हा तिची फौज तयार झाली होती. पण ठाकुर उच्चवर्णीयांच्या भिकेला बळी पडली नाही, ना गोरगरीबांना लुटलं. यातुन तिच्या मनाची दिशा व समतोल शेखर कपुरला दिसला नसेल का ? २२ ठाकुर मारले हे तेच मारले ज्यांनी अत्याचार केला. कोणावरही गोळ्या झाडल्या नाही. आणि आपला न्याय पुर्ण झाल्याची जाणीव झाल्यावर सरेंडर ही केलं. यात मनाची निश्चितता, ठराविक दिशा व तिची न्याय भुमिका दिसली नसेल का? १५ नोव्हेंबर १९९५ रोजी दीक्षाभूमी नागपुर इथे त्यांनी घेतलेली बौद्ध धम्माची दीक्षा यात निर्माल्य मनाची नैतिक अवस्था शेखर कपुरला दिसली नाही का ?का दाखवता आली नाही ? बुद्ध स्वीकारणारी ती खरंच वेडसर असेल का ? की तिचं अत्यंत मागास जातीतलं असणं, ठाकुर उच्चवर्णीयांचा बदला घेणं व बुद्ध स्वीकारणं हे कदाचित शेखर कपुरला वेडसर ठरवयाचं असेल. शेखर कपूरने Bandit Queen नावाचा तो सिनेमा म्हणून स्वताच्या उच्चवर्णीय विकृतीचं प्रदर्शन होतं ज्याला एका मागास जातीच्या स्रीचा संघर्ष दाखवताना पण आहे तसा न दाखवता misrepresent करुन दाखवला.
एका मागास शोषितजातसमुहात, विषमतावादी समाज रचनेत, न्यायाची अपेक्षा नसलेल्या देशात फुलनदेवीचा संघर्ष व त्याचं बुद्ध स्वीकारणं हा लढा मला तरी सम्राट अशोक, अंगुलमाल यांच्या ऐतिहासिक पाऊलवाटेवरचा वाटतो.

राहुल पगारे

लेखक औरंगाबाद येथील रहिवासी असून आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक – कार्यकर्ते आहेत.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*