सुमित्रा भावेंच्या ब्राह्मणी गेज (gaze) मधून रोहित वेमुलाच विकृतीकरण!

राहुल पगारे

रोहित वेमुला मेला आणि त्याचा भिंतीवर लटकलेला फोटो, फोटोला हार. व त्याच्या उभ्या आयुष्याची ओळख काय तर तो चांगला मुलगा होता पण नैराश्यात, आत्महत्या करुन गेला. हे पुरोगामी लेखक व कला दिग्दर्शकांनी रोहित वेमुलाची समाजासमोर केलेली टुकार दर्जाची मांडणी. कोणीतरी पुरोगामी भावे या सवर्ण पुरोगामी शॉर्ट फिल्म मेकर्सने वर केलेल्या वर्णनानुसार रोहित तीन चार सेंकदात त्यांच्या कासव नावाच्या शॉर्ट फिल्म मधे मांडला. यावर काही आंबेडकरवादी तरुणांनी आक्षेप घेतला तर उलटं त्यांंनाच सवर्ण व सवर्णांच्या नादी लागलेल्या मागासवर्गीय पुरोगाम्याकडुन दोन दिवसांत बुलींग केलं गेलं. शोषितसमुह जो लढा लढतोय त्यांच्या आयडॉलचं प्रदर्शन कसं वास्तव असावं याबद्दलचं मत, आक्षेप पण सवर्ण तथाकथित पुरोगाम्यांना अत्यंत अडचणीचं वाटायला लागलं. वरून नको ती लेबलिगं सुरू केली.

रोहित वेमुला नैराश्यात आत्महत्या करून गेला ही मा़डणी प्रचंड धुळफेक करणारी आहे. तो मेला यापेक्षा त्याला मरायला भाग पाडलं, ही एक इस्टीट्युशनल मर्डर, संस्थानिक हत्या हे सत्य दाखवायची, सांगायची हिम्मत सवर्ण पुरोगामी लेखक, दिग्दर्शककांना का होत नाही ? का सनातनी बामणांच्या नॅरेटीवला बळकट करायला पुरोगामी बामण आपल्या लेखण्या, आपल्या कलाकृती का झिझवतात ? रोहित वेमुलाची जी दीन मांडणी होते ती सवर्ण पुरोगामी आपल्या आंबेडकरवादी चळवळीला कशी बघु इच्छिते याचं ते उदाहरण आहे. शोषक ब्रिटिशांनी भगत सिंगाना फाशी दिली तर ती क्रांती ? आणि शोषक वर्ग असलेल्या ब्राह्मणी जातीय संस्थानी रोहित वेमुलाला फाशी घ्यायला भाग पाडलं तर ते नैराश्य ? इतका गंडलेलापणा यांना येतो कुठुन ?

रोहित वेमुलाच्या हत्येची खरं तर निष्पक्ष, पारदर्शक चौकशी झालीच नाही. अक्षरशः भाजपायी केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन प्रकरण फाशीवर आणुन सोडवलं. एक हत्येचा त्यांनी आत्महत्या दाखवलं. एका विद्यार्थ्याच्या हत्येसाठी विद्यापीठातला स्टाफ, कुलगुरू पासुन केंद्रीय मंत्रिमंडळाने तडकाफडकी कामाला लागावे असा कोणता प्रश्न ? कोणता धोका रोहितने ruling party, ruling class साठी उभा केला होता ? हा प्रश्न, शंका आपल्याला का पडत नाही ? रोहित वेमुला कोणत्या परिस्थितीत मेला यापेक्षा तो जगला कसा ? कशासाठी संघर्ष करत होता ? ही मांडणी पुरोगामी लेखक, दिग्दर्शकांना का करावीशी वाटली नाही ? नैराश्यात आत्महत्या करुन टांगलेल्या फोटो पुरता मर्यादित ठेवु पाहत जात असलेला रोहित या सवर्णांच्या नॅरेटीवला हानुन पाडलं पाहिजे.

रोहित एक अत्यंत दारिद्र्य भोगुन उच्च शिक्षणाची कास धरणारा विद्यार्थी होता. फक्त पोटार्थी विद्यार्थी नाही तर सामाजिक जाणिवा त्याच्या नसानसात भिनलेल्या होत्या. Poverty against wealth नाही तर poverty against justice कसं असतं हे तो सिद्ध करत होता. सुरुवातीला कम्युनिस्ट व कम्युनिस्टांचा जातीवाद लक्षात आल्यावर तो आंबेडकरवादी चळवळीत सक्रिय झाला. जो पर्यंत होता तोपर्यंत अल्पसंख्याक, शोषित sc st जागृत करायला तो सतत धडपडत राहिला. मुझफ्फरनगर अभी बाकी है मधुन तो हिंदू फॅसिझमला कोलत होता. कितीदा त्याला संघी संस्थाकडुन धमक्या मिळाल्या. पण तो या धमक्यांना भीक घालत नव्हता. He was such a hardcore Ambedkarite fellow. आपल्या दारिद्र्याच्या जाणिवा आपल्या पाठीवर लटकवून त्याला science fiction लिहायचं होतं, कार्ल सेगन सारखं. इकडे आय आयटी, आय आय एम झालेले सवर्ण स्कॉलर religious fiction लेखक होऊ पाहत असताना, रोहितचं लक्ष अथांग आकाशात, सृष्टीत पसरलेल्या विज्ञानाच्या गर्भात होतं. रोहितमधे वैज्ञानिक परिपक्वता होती, तो अॅक्टिविस्ट तो आंबेडकरवादी होता. रोहितच्या जगण्यातल्या समाज जाणिवा, त्याचं व्यवस्थेला भिडणं, फॅसिस्ट शक्तीना आव्हान देऊन त्यांना शिंगावर घेणं, सामाजिक चळवळ लढताना पण वैज्ञानिक लेखकाची मनिषा बाळगणं यात मला तर रोहित तर कुठेच कधी नैराश्य वाटला नाही.

उलट आपल्याला जे दिसलं ते त्याच्यातली जिद्द, समाज संवेदनशीलता, संघर्षाची उर्मी, वैज्ञानिक दृष्टिकोन, आणि प्रचंड आशावाद ! आपल्याला जे हे दिसलं ते सवर्ण पुरोगामी लेखक, दिग्दर्शकांना का दिसत नाही ? का त्यांना हे बघायचं नाही ? माझ्यामते तर रोहितच्या संस्थानिक हत्येचा प्रयत्न केला, तो मेला नाही अजुन ! माझ्यासकट कित्येकांचा तो आदर्श आहे. त्याने जानेवारी २०१६ पासुन आंबेडकरवादी चळवळीला radical shape दिला, दक्षिण ते उत्तर, पुर्व ते पश्चिम भारतात सक्रिय आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनाना त्याने झटक्यात पेटवलं. कितीतरी सहपथिक चळवळीच्या नावाने तथाकथित पुरोगाम्याचे त्याने बुरखे फाडले. त्याने पेटवलेलं विद्यार्थी आंदोलन हा मागच्या कैक दशकांपासून सुस्तीत पडलेल्या चळवळीला चेतना, स्पार्क देऊन गेला. पॅन इंडिया, भारतभर विविध आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनाना जोडणारा केंद्र बिंदू ठरला तो. २०१६ नंतर आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनांनी जी सक्रीयता आणली, समाज राजकीय दृष्टीकोनात जो आमुलाग्र बदल आणत चालली त्याचं श्रेय रोहित वेमुलाला जातं. म्हणुन जो बामणी पुरोगामी लेखक पुरोगामी दिग्दर्शक ब्रामणी स़स्थानिक जातीवादाला, त्या नीच प्रवृत्तीला अधोरेखित करण्या ऐवजी जर का रोहित वेमुला म्हणजे नैराश्य, नैराश्य म्हणजे रोहित अशी जी मांडणी करत असतील तर असल्या सडक्या मेंदुला पिटाळून लावा. रोहित आमच्यासाठी एक positive vibes होता, आपली चळवळीची ऊर्जा व दृष्टी त्याने एका पिढीत संक्रमित केली. He was a revolutionary, a jewel of Ambedkarite movement

❤️

राहुल पगारे

लेखक औरंगाबाद येथील रहिवासी असून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

3 Comments

  1. कसला फडतूस लेख आहे. अरे माठ्या पगारे, जर शिकून कामधंदा कर फुकट जातीयवादी ओकऱ्या काढण्यापेक्षा.

    • माठ्या… ओकाऱ्या तर तुझ्या निघाल्यात जातीवागी गांडुळा…

  2. “केला जरी पोत बळेच खाली
    ज्वाला तरी ते वरती उफाळे ।”
    संघर्षाची धग पेटती ठेवणेच संघर्ष विजयाची नांदी असते. ही धग तुरळक आणि पसरलेली असली तरी पर्वा नाही! जयभीम !

Leave a Reply

Your email address will not be published.


*