कर्णनच्या निमित्ताने इथल्या जात वास्तवाची समीक्षा

पवनकुमार शिंदे

स्त्रोत – इंटरनेट

आमचा प्रांत पुस्तके व ग्रंथात रमण्याचा. तथापि चळवळीतील मित्रांनी सुचविलेले, समीक्षा केलेले चित्रपट आम्ही नक्की पाहतो.
कर्णन बद्दल मित्रांनी लिहिलेल्या बेहतरीन समीक्षा वाचल्या.
चित्रपट पाहण्याची प्रचंड उत्सुकता होती. रात्री पाहिला. झोप उडते.

चित्रपट बनविणाऱ्या टीमचा” philosophical School of Thought कोणता आहे ? याबद्दल आम्हास माहीत नाही. असे असले तरी आमच्या दृष्टीने चित्रपटाबद्दल दोन निरीक्षणे मांडतो,

१) “Broken Social Contract– The Constitution Of India”
या पुस्तकावर गेली काही वर्षे आम्ही काम करत आहोत, ती थियरीच २ तासात सिद्ध होताना दिसते. कागदोपत्री de jure गाव आहे, (पोस्टमन येऊन कर्णन ला नियुक्ती पत्र देतो त्यावरून) पण de facto ते गाव शेजारील गावासाठी, प्रशासन आणि खाजगी संस्थासाठी अस्तित्वात नाही. किंबहुना त्या गावाचे स्वतंत्र अस्तित्व असणेच त्यांना खुपणारे आहे. ते गाव बेचिराख व्हावं, नष्ट व्हावं असे उघड बोलून दाखविल्या जातं.

२) “माझ्या जीवनाचे तत्वज्ञान” भाषणात बाबासाहेबांनी सांगितले होते की भारतीय नागरिक विसंगत जीवन जगत आहे. संविधानाने त्याला त्रिसूत्री– समता, स्वातंत्र्य आणि मित्रता दिली आहे. हा ध्येयवाद राष्ट्राचा ध्येयवाद आहे. परंतु बहुसंख्य नागरिकांचा सामाजिक ध्येयवाद- त्रिगुण तत्वज्ञान, ज्याचं अधिष्ठान धर्म आहे, ते त्रिसूत्री नाकारते. एवढेच नाही तर त्रिसूत्री व्यवहारात येऊ नये म्हणून षडयंत्र करण्यात येतात. अगदी हेच चित्र कर्णन मध्ये दिसते.

त्रिगुण तत्त्वज्ञानाने ज्यांचे जीवन नियंत्रित होते ते प्रशासकीय अधिकारी, खाजगी संस्था, सामान्य नागरिक, कर्मचारी पोदुयकुलम गावाबद्दल कमालीची तुच्छता बाळगतात. मित्रता, समता

बाबासाहेबांनी ‘स्वतंत्र वसाहत’ हे सरंक्षण प्रावधान– भारतातील ‘जातीयवादी खेड्यांच्या व्यवस्थेपासून मुक्ती’ म्हणून संविधानात टाकण्यासाठी संघर्ष केला होता. बाबासाहेब या प्रावधानाला “New Life Movement” म्हणायचे. नवजीवन चळवळ ही एखादं दुसरे गाव वसवावे अशी नव्हती. प्रचंड मोठी लोकसंख्या घेऊन जिल्हा बनेल या अर्थाने होती.

कर्णन चित्रपटातील गाव एक स्वतंत्र वसाहत आहे. एकट्या दुकट्या जातीने कुठल्यातरी कोपऱ्यात स्वतंत्र वसाहत केल्यावर कोणत्या अडचणी येतील याचे ते एक उदाहरणच आहे.

स्त्रोत – इंटरनेट

लोकशाहीत effective vote base ला महत्व आहे. कर्णन च्या गावचे तसे नाही. या चित्रपटात राजकारणी लोकांची रेलचेल दिसत नाही. एकाच फ्रेम मध्ये राजकीय पुढारी आहे. बस स्टॉप च्या पाटी उदघाटनासाठी.

व्यक्तीच्या जीवनात एकप्रकारचा तुसडेपणा व प्रचंड राग या जाती व्यवस्थेच्या आवळलेल्या फासामुळे, केलेल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अन्यायामुळे निर्माण होतोय- याचे जज्वजहाल व्यक्तिमत्व म्हणजे कर्णन…वरिष्ठ वर्गाला देखील याची जाणीव आहे. तथापि सगळ्या अनुभवातून भाजून निघाल्याने त्यांनी स्वतंत्र वसाहतीचा निर्णय घेतलेला दिसतो. पण तिथे देखील प्रशासकीय जातीव्यवस्थेने त्यांना सोडले नाही.
म्हणजे कुठेही जा, जातीचा साप सोडणार नाही, हे बाबासाहेबांनी Annihilation of Caste मध्ये व्यक्त केलेले वाक्य नजरेत येतं…

भारतीय संविधानात कोणत्या तरतुदी असाव्यात ? यावरून भारतात तुंबळ युद्ध सुरू होते. युद्धजन्य छावण्यात सुरू असलेल्या या युद्धातील छावणीचे लीडर बाबासाहेब आंबेडकर होते. जोपर्यंत राष्ट्रीय जीवनातील विविध घटकात संविधान बद्दल एकमत होत नाही, तोपर्यंत ब्रिटिश भारताचे स्वातंत्र्य – सत्तेचे हस्तांतरण करणार नव्हते. शेवटी एकमत झाले. या एकीकरणात बाबासाहेबांची भूमिका सर्वात मोठी. बहिष्कृत वर्गाच्या ७० (कमीअधिक) पैकी ७ संरक्षण प्रावधान वर्तमान संविधानात करार म्हणून त्रैवर्णीक घटक आणि त्यांनी नियंत्रित केलेल्या जातीय बहुसंख्याक गटाने मान्य केला.
तथापि हा जो करार होता तो करार एक एक करून खिळखिळा करण्यासाठी गेली ७४ वर्षे सत्तेचा दुरुपयोग त्रैवर्णीक घटकाकडून केला गेला. परिणाम एस सी, एस टी, ओबीसी घटकांचे प्रश्न व समस्या कमी होण्या ऐवजी वाढत आहेत. अशाप्रकारे सदर करार एकतर्फी तोडल्या मुळे निर्माण झालेल्या भंगलेल्या सामाजिक कराराच्या या काळात बहुजन समाजातील घटकांना या आणीबाणीच्या परिस्थितीतीला तोंड कसे द्यावे हा प्रश्न पडलेला आहे. न्यायालयीन प्रक्रियेद्वारे ? आंदोलन क्रांती द्वारे ? प्रसंगी हिंसा ? कर्णन मध्ये हाच प्रश्न अधोरेखित होतो.

पोलीस स्टेशन मधील धुमश्चक्रीत बाबासाहेबांच्या फोटोला हलकासा धक्का लागलेली फ्रेम आहे !

२५ नोव्हेंबर १९४९, संविधान सभेत बाबासाहेबांनी संविधान सुपूर्द करताना दिलेली चेतावणी,
ते म्हणाले,

” In our social and economic life, we shall, by reason of our social and economic structure, continue to deny the principle of one man one value.How long shall we continue to live this life of contradictions ? How long shall we continue to deny equality in our social and economic life ? If we continue to deny it for long, we will do so only by putting our political democracy in peril. We must remove this contradiction at the earliest possible moment
or else those who suffer from inequality will blow up the structure of political democracy which this Assembly has so laboriously built up.”

पवनकुमार शिंदे

लेखक ‘प्रज्ञासूर्याच्या प्रखर तेजाकडे – चला बाबासाहेबांच्या मूळ ग्रंथाकडे महाअभियान’, राष्ट्र हितकारिणी सभा, परभणी चे संकल्पक – प्रवर्तक आहेत.

2 Comments

  1. मला वाटते की SC/ST हे एकीकडे आहेत आणि OPEN/OBC हे दूसरीकडे आहेत.

    आपण यावर मार्गदर्शन करावे सर.

Leave a Reply

Your email address will not be published.


*