सरोगसी….. भारतातलं एक दाहक जातवास्तव

ॲड.(डॉ) मनिषा रणपिसे

जगात प्रत्येक सेकंदाला तीन मुलं जन्माला येतात. जगातल्या सहा जोडप्यान पैकी एका जोडप्याला infertility चा प्रॉब्लेम आहे. 80-90 च्या शतकात test tube baby, artificial womb सारखे प्रयोग होत होते. पण प्रयोगाअंति गर्भाच्या वाढीसाठी स्त्री च्या गर्भाशयासारखी सुरक्षित, पोषक जागा नाही हे लक्षात आल. भारतात लग्न झालेल्या जोडप्यांना मुलं न होणं म्हणजे एक सामाजिक समस्या सारखा प्रकार आहे. Adoption म्हणजेच मूल दत्तक घेणे हा यावर एक उपाय होता. अनेक परदेशीं जोडपी भारतातील अनाथ आश्रम मधील गरीब मुलांना दत्तक घेऊन परदेशात घेऊन जात. पण यात पण भारतीय सरकारने अतिशय कडक नियम करून foreign adoption ची टक्केवारी खूपच कमी केली होती.

सरोगसी म्हणजे rent a womb….एखाद्याच गर्भाशय भाड्याने घेणे. थोडक्यात like outsourcing pregnancy. आजघडीला जवळपास 300 million dollar च्या वरती सरोगसी चा व्यवसाय आहे . गेल्या काही वर्षात भारतातल्या छोट्या शहरात सरोगसी केसेस खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या. याच काळात private fertility clinics जागोजागी दिसायल्या लागल्या.परदेशातील तसेच देशातील जोडप्यांसाठी भारताची ….सरोगसी mothers साठी favourite destination म्हणून ओळख झाली. याच मुख्य कारण इतर देशाच्या मानाने स्वस्त मेडिकल ट्रीटमेंट, less legal formalities, plenty & easy availablity of surrogate mothers.

मागच्या काही वर्षात बऱ्याच सेलिब्रिटी, फिल्म ऍक्टर्स,उद्योगपती, business women …….सरोगेट mothers च्या साहाय्याने….नऊ महिने प्रेग्नन्सी चा शारीरिक, मानसिक त्रास सहन न करता, आपल करिअर सांभाळून , आपली शारीरिक सुंदरता, figure maintain करून, रेगुलर पार्ट्या अटेंड करून,destination tours & travelling करून…अचानक एक दिवस सरोगसी ने मिळालेल् ते रेडीमेड बाळ आणी त्यांचे फोटोज .. एक happy & complete family म्हणून मीडियात दिसायला लागतात. मीडिया पण यांनी काहीतरी सामाजिक कार्य केल्यासारखं त्यांना प्रोजेक्ट करतात.

पण भारतात Ground level वरती surrogate mothers च मोठ्या प्रमाणात आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण होत. बहुतेक या स्त्रिया गरीब, बहुजन समाजातील, कमी शिकलेल्या , लग्न झालेल्या,seperated, divorcee असतात. सरोगसी साठी त्या तयार होतात त्याची मुख्य कारण….गरीबी, बेरोजगारी,मुलांचं शिक्षण, नवऱ्याला काम धंदा नसणं, घर बांधण्यासाठी, रोजचा घरचा खर्च, कर्जाची रक्कम फेडण्यासाठी हि आहेत. यासाठी गरीब स्त्रिया स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करताना दिसून येतात,. प्रेग्नन्सी च्या काळात surrogate mother ला वर्षभर वेगळं ठेवले जात, त्याकाळात तिच्या स्वतःच्या मुलांकडे दुर्लक्ष्य होणं, नवऱ्याचं दुसऱ्या स्त्री सोबत संबंध होणं, पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होणे असे अश्या कौटुंबिक समस्या पण दिसून आल्यात.

surrogacy contract ची copy हि तिच्याकडे नसते, मुलाचं जन्म झाल्यावर अनेक जोडपी मनासारखं मुलं झालं नाही, मूल दिसायला त्यांच्यासारखं झालं नाही म्हणून मुलाची custody घेत नाहीत..,Surrogacy bill 2021 मध्ये लोकसभेत मंजूर झालं पण surrogate mother च्या सुरक्षेबाबत बिल मध्ये खूप त्रुटी आहेत. यात तिला किती पैसे मिळणार याबद्दल पारदर्शकता नाही, health insurance नाही, health complications झाल्यास,त्या स्त्री चा त्यात मृत्यू झाल्यास, compensation साठी काही liabilities नाहीत. तीच मानसिक आरोग्य जसे दुसऱ्याच बाळ जरी असलं तरी पोटात वाढणाऱ्या बाळासोबत त्या काळात तीच एक भावनिक नात तयार होत असत… Depression, psychological issues ना बिल मध्ये पूर्णपणे नजरअंदाज केलेय. बर ज्या बाळासाठी इतका त्रास सहन केला त्या सरोगेट mother चं नाव हि बाळाच्या birth certificate वर लिहीत नाहीत

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी हि फक्त नऊ महिन्याकरता मर्यादित नसून त्याचे अनेक मानसिक आणी शारीरिक complications स्त्रीला आयुष्यभर सहन करावे लागतात.

Sadly many social, ethical & legal issues related to surrogacy remain unanswered…

ॲड.(डॉ) मनिषा रणपिसे

लेखिका पुणे येथील रहिवासी असून अधिवक्ता आहेत. त्या Demography विषयातील डॉक्टरेट आहेत, तसेच Public Health ह्या विषयावर त्यांनी काम केलेलं आहे, त्यांनी ह्या विषयासंदर्भात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर शोधनिंबध सादर केलेले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*