निवडक शाहू :- भाग 1~ विकास कांबळे
शाहू राजा एक अजबच रसायन होते. कधीकधी ते एकटेच कुठेही भटकायला जात. शिपाई नाही, रथ नाही, संरक्षक नाहीत. मनात आले की स्वारींनी घोड्यावर मांड ठोकली आणि मग दिसेल तो रस्ता. एकदा श्रावणात असेच अचानक एकटेच महाराज बाहेर पडले आणि पंचगगेच्या काठी पोहचले. शेजारीच मक्याचे पीक तरारले होते. कोवळी लुसलुशीत कणस […]