सावित्रीमाईस अभिवादन!

मिनल शेंडे

३ जाने.१८३१ ला भारत भूमी वर सावित्रीबाईचा जन्म झाला .१९व्या शतकात स्त्री, शूद्र, अतिशुद्रांना गुलामीची वागणूक दिली जात होती. हे तुलसीदासाच्या ओवी वरून स्पष्ट दिसून येते
ढोल गवार पशू शुद्र नारी
ये सब ताडन के अधिकारी

अशा काळात स्त्री व अतिशुद्र यांच्या साठी शिक्षणाचे दार खुले करणे हे किती कठीण होते याची कल्पना येते.१ जाने.१८४८ मध्ये बुधवार पेठ येथे फुले दंपती ने मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली. ज्यांनी आम्हाला विद्या दान दिले.या सावित्रीमाईस आणि भारतातील पहिल्या भारतीय स्त्री शिक्षिकेला अभिवादन.
ज्या समाज व परिस्थिती मधून मुले व मुली येतात त्यांचा बरावाईट परिणाम त्या मुलांच्या शिक्षणावर होत असतो हा शैक्षणिक सिद्धांत १८५३ मध्ये मांडला. प्रशिक्षित शिक्षक हा त्याच समाजातला असावा म्हणून शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी normal school ची स्थापना केली त्या स्त्री शिक्षणतज्ञास अभिवादन.

स्त्री जातीची विटंबना,छळ करणाऱ्या अघोरी अशी केशवपन प्रथेच्या विरुद्ध या देशात न्हावी यांचा संप घडवून आणणाऱ्या पहिल्या क्रांतीकारी स्त्रीस अभिवादन.

ब्राह्मण विधवांसाठी पहिला बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून बाळंत महिला व त्यांच्या मुलांची वात्सल्याने सेवा करणाऱ्या मातृत्वास अभिवादन .

उदयोग, विद्यादान, सदाचरण,व्यसने आणि कर्ज यांविषयावर भाष्य करुन माणसातील पशुत्व नष्ट करुन मनुष्यत्व प्राप्त करुन जीवन जगण्यास प्रेरित करणारऱ्या आईस अभिवादन.
” विद्या देणारा हा धैर्यशाली बनून विद्या घेणारा सामर्थ्यशाली शहाणा बनतो “. असा विचार मांडणाऱ्या लेखिका , विचारवंत यास अभिवादन.
ज्योतीबांचे निधन झाले तेव्हा फुले मंडळीनी यशवंतास दत्तक पुत्र असल्याने प्रेतयात्रेपुढे टिटवे धरु देण्यास विरोध केला त्यावेळस सावित्रीबाई नी प्रेतयात्रेपुढे टिटवे धरले होते. आज वर्तमानात सुध्दा महिला असा पुढाकार घेण्याच विचारही करणार नाही. काळाच्याही पुढे जाणाऱ्या आदर्श पत्नीस अभिवादन.

   ज्ञान नाही विद्या नाही 
   ते घेण्याची गोडी नाही 
   बुद्धी असूनही चालत नाही 
   तयास मानव म्हणावे का?

19व्या शतकात निसर्ग, सामाजिक,प्रार्थनापर , आत्मपर, काव्यविषयक, बोधपर, इतिहास विषयक आणि स्फूट कविता यांसारख्या फक्त कविता करणाऱ्याच नाही तर काव्यात क्रांती घडवून आणणाऱ्या पहिल्या कवियित्रीस अभिवादन.
सत्यशोधक विवाह, शेतकऱ्यांचेशिक्षण,दुष्काळात लोकांसाठी अन्नछत्रे,बालहत्या प्रतिबंधक गृह,
मोफत शिक्षण देण्यास मागणी सर्व कार्यात ज्योतीबां सोबत नेतृत्व करणाऱ्या सावित्रीबाई निर्भय पणे लढत होते. प्लेग च्या साथीत लोकांचे जीव वाचवतांनी करूणावान आईच निधन झाले.

एक स्त्री म्हणून 19 व्या शतकात नेतृत्व करतानी येणाऱ्या बिकट,भयावह प्रसंगास तोंड देऊन कार्य पूर्णत्वास नेणारी भारतातील सर्व जातीतील स्त्रियांची पुढारी.स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्याय या तत्वांना भारतात रूजविणारी क्रांतीकारी सावित्रीमाईस विनम्र अभिवादन.

ज्या बुधवार पेठेत भारतातील पहिल्यांदा मुलींचे शिक्षणाचे दार खुले केले होते ते आज ज्या दयनीय अवस्थेत आहे त्या ठिकाणी नव्याने शाळा उभारुन मुलींची शाळा सुरु करुन या देशाला सावित्रीमाईच्या क्रांतीकारी कार्याचे स्मरण करुन दिल्याने, त्यांच्या कार्यावर आरुढ होऊनच खऱ्या अर्थाने शिक्षणतज्ञ सावित्रीमाईस अभिवादन होईल.

मिनल शेंडे

लेखिका भंडारा येथील रहिवासी असून Buddhist studies च्या विद्यार्थीनी/अभ्यासक आहेत.

1 Comment

  1. Go, Get Education…

    All gets Lost
    Without knowledge,
    We become animal
    Without wisdom,
    Sit idle no more
    Go get education,

    End misery of the
    Oppressed and forsaken,
    You have got a golden chance
    to learn,
    So learn and break the chains of Caste..!

    Savitri bai Phule…🙏💐

Leave a Reply

Your email address will not be published.


*