कसला इतिहास? कसले नायक?

सागर अ. कांबळे भारताचा इतिहास, त्यातही आधुनिक भारताचा इतिहास म्हटलं की काय आठवतं? ब्रिटिशांनी भारत कसा काबीज केला… ब्रिटिशांच्या जुलमी राजवटी विरोधात लढा देवून भारताने कसे स्वातंत्र्य मिळवले. लोकस्मृतीमध्ये दोन गोष्टी साठवल्या गेल्या. लोकस्मृतीपेक्षा शिक्षण- सांस्कृतिक धोरणातून राज्याने (सत्ताधारी वर्गाने) लोकांची घडवलेली सार्वजनिक स्मृती असेही म्हणता येईल. त्या दोन गोष्टी […]

माणसांचा कोळसा…

प्रकाश रणसिंग महाड मधे उतरल्याबरोबर उन्हाने डोक्यावर थयथयाट मांडला होता. महाड च्या एका कार्यकर्त्याला घेऊन महाड मधील एका कातकरी वस्तीवर भाषेच्या अभ्यासासाठी भेट द्यायची होती. कार्यकर्ता उत्साही होता. त्यानं झपदिशी गाडीची सोय केली. महाडपासून एक तीस-चाळीस किलोमीटर सणाऱ्या गावाच्या दिशेने प्रवास सुरु झाला. रस्ता जेमतेम होता. खाण्यासाठी काही फळे सोबत […]

प्रजासत्ताक भारताची गरिमा (?)…..

January 27, 2021 मानसी एन. 0

मानसी एन. मोदी सरकारने २०१७-१८ मध्ये ‘लाल किल्ला’ ‘दालमिया भारत’ या खाजगी कंपनीकडे देखभालीच्या नावाखाली हस्तांतरित केला, तेव्हा या ऐतिहासिक वारसा स्थळाच्या सन्मानाला धक्का पोहोचला नाही. मात्र, शेतकरी जेव्हा लाल किल्ल्यावर पोहोचून सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा लगेच लाल किल्ल्याच्या ‘गरिमेला’ धक्का पोहोचतो. आंदोलनाला डाग लागतो. नसलेल्या […]

भारत नावाचे अवकाश पुन्हा हिंदुस्थान नावाच्या खाईत हरवू नये..

सुरेखा पैठणे “We the people of India” ह्या पहिल्याच वाक्यात तुकड्या तुकड्यात खंडित झालेल्या आणि गुलामगिरीच्या ओझ्याने वाकलेल्या ह्या हिंदुस्थानमधील प्रत्येक नागरिकाला “भारत” नावाचे स्वतंत्र अवकाश बहाल केले, २६ जानेवारी ला लोकांनी लोकांकरिता चालविलेले लोकतंत्र म्हणत प्रजासत्ताक भारत अस्तित्वात आला आणि मानविय मूलभूत हक्क संवैधानिक चौकटीत सुरक्षित झाले. शेकडो वर्षांची […]

No Image

भिडेवाडा: क्रांतीचं अभूतपूर्व स्मारक

January 1, 2021 Sakya Nitin 0

साक्य नितीन १ जानेवारी १८४८ रोजी जोतिबांनी सावित्रीमाई आणि फातिमामाईला सोबत घेउन तात्याराव भिडेंच्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सूरु केली. ही एक अभुतपूर्व क्रांतिकारी घटना होती. या घटनेने भारतात एका नव्या क्रांतीची सुरवात केली. या क्रांतीच अपत्य असणाऱ्या मुक्ताईने पुढे “आमचा धर्म कोणता?” असा परखड सवाल धर्मव्यवस्थेला केला. जेव्हा […]

No Image

बाबासाहेबांना खरे अभिवादन

November 25, 2020 Editorial Team 1

सुनील कदम चैत्यभूमी म्हणजे कुठलं देवस्थान नाही की दर्शन घेतलंच पाहिजे त्या शिवाय नवस फिटत नाही. हे दर्शन घेण्याचं ठिकाण नाही, आपण तिथे अभिवादन करायला जातो. अर्थात चैत्यभूमी वर जाऊन अभिवादन करणं वेगळंच असतं, आपण वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा घेऊन येत असतो परत. परंतु आजच हे संकट वेगळं आहे, जागतिक […]

No Image

चल हूँ की, चल हूँ सखी.. अब नाहीं अनपढ़ रहवै..

October 24, 2018 pradnya 0

जातीवादाची पाळंमुळं इथल्या जमिनीत खोलवर रुजलेली आहेत, त्याची झळ लहान मुलांना बसली नाही असं अजिबात नाही. बिहारमधल्या गया जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातली ८-९ वर्षांची चिमुकली शाळेत होणार भेदभाव सांगते, दलित-महादलित म्हणून हिणवल्या गेलेल्या समाजात बंधनमुक्त होण्याचं प्रचंड मानसिक बळ आहे. आपल्या गाण्यातून ती तीच या जातीच्या जोखडातून उन्मुक्त होण्याचं स्वप्न […]

No Image

कुंभारापरी तू भीमा समाजाला घडविले…!!!

October 18, 2018 pradnya 0

कुंभारापरी तू भीमा समाजाला घडविले… !!! कुंभारापरी तू भीमा, समाजाला घडविले धिक्कारून गुलामीला बुद्धाकडे वळविले… कडुबाई खरात सौजन्य : किरण खरात youtube चॅनेल

No Image

स्त्री मुक्ती असावी पण त्यात आपली बायको सून मुलगी बहीण ?

October 15, 2018 pradnya 4

माणसाचा जन्म कोणत्या कुटुुंबात व्हावा हे त्याच्या किंवा तिच्या हातात नसतं. माणूस विशिष्ट कुटुुंबात अनवधानाने जन्म घेतो व त्याचा पुढील प्रवास सुरू होतो.माणूस ज्या कुटुुंबामध्ये जन्म घेतो त्या कुटूंबाला जातीचे-धर्माचे कंगोरे असतात. कुटुंब हा समाजाचा भाग असल्याने समाजानुसार भौतिक प्रश्न बदलतात. स्वाभाववकपणे व्यक्तीची जडणघडण बदलते.माझा जन्म असाच पूवााश्रमीच्या दलित व […]