मिलेनिअल्स आणि क्रांतीबा फुले

पवनकुमार शिंदे ● स्पार्टा–300 चित्रपट 300 स्पार्टन सैनिकांनी पर्शियाच्या हजारोंच्या फौजेसोबत कसा चिवट लढा दिला याचे चित्रण करणारा हॉलिवूड चित्रपट 2006 मध्ये फार गाजला. भारतातील युवा वर्गात कल्ट उभे राहिले, एवढा लोकप्रिय हा चित्रपट होता. 137 वर्षांआधी, 1883 ला क्रांतीबा फुले यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथात शुद्रतिशूद्र व शेतकऱ्यांनी स्पार्टाच्या […]

बुद्ध-भीम सबकॉन्शयस माईंड मध्ये उतरवणारं आमचं विद्यापीठ!

राहुल पगारे काय माहोल होता तो ! आमच्या बौद्धवाड्यात विहार सुद्धा नव्हतं. पंधरा वीस घरापैकी अर्धी घरं पत्राची तर अर्धी घरं पाचोटा टाकलेल्या ओसरीची होती. आणि या वस्तीच्या मधोमध फक्त एका ओट्यावर एक निळा झेंडा रोवलेला. आणि त्या निळ्या झेंड्याखाली अख्खा बौद्ध वाडा एकत्र येऊन बसायचा. थोड्या अंतरावर एक वाढलेलं […]

आदिवासींचं अस्तित्व फक्त शो-पीस/डाटा इतकचं?

प्रकाश रणसिंग “…. बाहेरून आपल्याकडे ‘ शो पीस’ म्हणून पाहणारे लोक आपला वापर शो पीस म्हणूनच करीत आहेत हे लक्षात घ्या. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी आमचे राज्यकर्ते दिल्लीच्या राजरस्त्यावरुन जी धिंड काढतात, तो शोच असतो. ती एका परीने आमची धिंडच असते. त्यातून वैभवशाली दारिद्र्य, नालायकपणाच आम्ही दाखवत असतो. ती नृत्य आणि […]

भारतीय शेती आणि शेतमजुरांच्या आत्महत्या

विकास परसराम मेश्राम २०११ च्या जनगणनेनुसार देशात एकूण २६.३ कोटी लोक शेतीमध्ये गुंतले आहेत, त्यापैकी ११.८ कोटी शेतकरी होते आणि १४.५ कोटी शेती मजूर होते. गेल्या १० वर्षात शेतमजुरांचे दर तेच राहिले, जे २००० ते २०१० च्या दरम्यान होते, तर असे गृहीत धरता येते की शेतमजुरांची संख्या १५ कोटींवरून लक्षणीय […]

बोलीभाषेला डिग्नीटी मिळवून देणारा नागराज अण्णा!

निलेश खंडाळे एखाद्या चित्रपटाचा प्रभाव हा समाजमनावर किती होऊ शकतो याबद्दल सर्वाधिक चर्चा झालेलं वर्ष म्हणजे २०१६. अनेक मतप्रवाह यातून समोर आले. ही घुसळण भूतो न भविष्यती अशीच होती. इतकी टोकदार चर्चा इथून पुढे कधी होईल की नाही माहिती नाही. निमित्त होतं सैराट ! त्या दरम्यान एक सतत वापरलं गेलेलं […]

कोकणातील माझ्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या आठवणी…

प्रज्ञा सिध्दार्थ जाधव डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह. राजापूरच्या बऱ्यापैकी लोकांना हे ठिकाण माहीत असेल. नाव वसतिगृह असलं तरी ते जवळपास बारा वर्षांसाठी आमचं घर होतं. बौद्धजन पंचायत समिती, राजापूर तालुक्याच्या सभा इकडेच होत असत. वर्षभर अधून मधून सभा असायच्या तेव्हा मम्मी सर्वांसाठी चहासोबत कधी पोहे तर कधी भजी असे […]

१८५७ च्या तथाकथित स्वातंत्र्याच्या बंडाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत

पवनकुमार शिंदे सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यास बळकटी मिळण्यासाठी कायदेमंडळात बनलेल्या ‘Law’ च्या सुरक्षा कवचाची आवश्यकता असते असे बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले होते.ब्रिटिशांच्या १५० वर्षांच्या अंमलात केवळ ६ सामाजिक परिवर्तनाचे कायदे बनले. त्यातही अस्पृश्यतेच्या व जाती व्यवस्थेने विरुद्ध अर्धमुर्धा देखील कायदा बनला नाही. याचे कारण सांगताना बाबासाहेब लिहितात, ” Fear of breach of […]

“मेरिटॉक्रसी: एक घातक मिथक” (भाग ५)

गौरव सोमवंशी या भागात आपण काही महत्त्वाच्या लिखाणावर लक्ष देऊन पाहू. लिखाण कोणी केलं आणि लिहिणाऱ्याची सामाजिक भूमिका काय किंवा राजनैतिक दृष्टीकोन कोणता आहे हे या भागात महत्वाचं नाही, कारण आपण पिकेटी पासून ग्रेबर (परस्परविरोधी भूमिका असणारी) मंडळींचे काही निवडक लिखाण बघणार आहोत. प्रत्येक वाक्य हे पहिले इंग्रजीत तसच्या तसं […]

फक्त EVM बदलून काहीही होणार नाही, निवडणूक प्रक्रिया (FPTP) बदलावी लागेल

सागर अ. कांबळे २०१९ यावर्षी ख्रिस्तोफी जॅफरेलॉट आणि इंडियन, वेस्टर्न अशा अकॅडमिक स्कॉलर्सनी मिळून ‘Majoritarian State (बहुसंख्यांकवादी राज्य)’ असं पुस्तक काढलं. त्यामध्ये हिंदू राष्ट्रवाद आणि त्यामुळे भारत देश कसा बहुसंख्यांकवादी बनत आहे यावर निवडणुकांपासून ते आर्थिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आयामांवर विस्तृत चर्चा आहे. वेगवेगळे लेख आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपली […]

लॉकडाऊन म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर!

राकेश अढांगळे गेल्या वर्षी कोरोनाबद्दल कोणतीही माहिती नव्हती, आकडेवारी नव्हती, लसही नव्हती. PPE Kits, सॅनिटायझर आणि मास्क सोबत चीनने लॉकडाउन नावाचा पर्याय वापरात आणला होता, तोच युरोपीय देशानी स्विकारला व जगभर तेच सर्वानी स्विकारले. कालांतराने बरेच पर्याय आले, अर्थचक्राला परवडणारे नव्हते म्हणून बऱ्याच देशानी लॉकडाउन उठवले. कोरोनाला ज्यापद्धतीने प्रस्तुत केले […]